Ad will apear here
Next
अनाथ, दृष्टिहीन दाम्पत्याच्या विवाहाला आसरा फाउंडेशनचा मदतीचा हात
सामाजिक कार्यकर्त्यांची गर्दी


नाशिक :
मुला-मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे विवाह जुळवण्याच्या प्रक्रियेमध्ये अलीकडे अनंत अडचणी निर्माण होत आहेत. मुलगा किंवा मुलगी शारीरिक विकलांग असेल, तर अडचणींमध्ये आणखीच वाढ होत जाते. या पार्श्वभूमीवर, नाशिकमध्ये नुकताच झालेला सुरेश पाटील आणि रत्ना पांगारे या अनाथ, दृष्टिहीन दाम्पत्याचा विवाह वेगळा ठरावा. लोकसहभागातून आणि आसरा सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने हा विवाहसोहळा नाशिक रोडमध्ये पार पडला. त्याची सर्वत्र चर्चा आहे.
  


मुंबईतील कल्याणमध्ये वास्तव्य करणारे सुरेश पाटील हे अंध आणि अनाथ आहेत. पुण्यातील नसरापूर येथील रत्ना पांगारे याही अंध असून, त्या सिंगल पॅरेंट चाइल्ड आहेत. रत्ना पांगारे यांना नाशिक रोडमधील गोसावीवाडीतील आसरा सोशल फाउंडेशनचे पिंटू थोरात यांची माहिती मिळाली. त्यांनी सर्व हकीकत पिंटू थोरात यांना सांगितली. त्यानंतर पिंटू थोरात यांनी वरसंशोधनाला सुरुवात केली. अंध बांधवांच्या मदतीने सुरेश पाटील यांचे नाव पुढे आले. मुला-मुलीची पसंतीही झाली. दोघांचीही घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दोघेही विवाहाचा खर्च करू शकत नव्हते. त्यामुळे पिंटू थोरात आणि त्यांच्या सहकारी सामाजिक कार्यकर्त्यांनी आसरा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विवाह करायचे ठरवले. 

पिंटू थोरात यांनी रत्ना पांगारे यांना आपली बहीण समजून स्वतःच्या घरात विवाहसोहळा करायचे ठरविले. यासाठी त्यांनी डीजे, मांडव, पाहुण्यांसाठी खानपानाची शाही लग्नासारखी व्यवस्था केली. गोसावीवाडी येथे पिंटू थोरात यांच्या घरी हळदीच्या दिवसापासूनच नाशिक रोडचे सामाजिक कार्यकर्ते, रिक्षाचालक आणि अंध बांधवांनी गर्दी केली होती. त्यानंतर १२ मे रोजी सकाळी अकरा वाजता सुरेश पाटील यांची गोसावीवाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढून त्यांना जैन भवन येथे नेण्यात आले. 

हा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. अगदी स्वतःच्या घरातील लग्नाप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांनी या विवाहसोहळ्याला सहकुटुंब हजेरी लावली आणि कामही केले. पिंटू थोरात यांच्या सहचारिणी सारिका थोरात आणि आई गीताबाई बाबूराव थोरात यांनीही या विवाहात महत्त्वाची भूमिका निभावली. 

रत्ना या पुण्यामधील एका खासगी शाळेत शिक्षिका असून, सुरेश पाटील हे पदवीधर आहेत. कल्याणच्या रेल्वेस्टेशनवर फिनेल, शैक्षणिक साहित्य, गृहोपयोगी साहित्य विकण्याचे काम ते करतात. 

या विवाहसोहळ्याला अनेक दानशूरांनी मदत केली. विवाहासाठी उपस्थित असलेल्यांचे डोळे पाणावले होते. या विवाहासाठी पिंटू थोरात यांच्यासह रत्नाकर सचिन आहेर, सचिन जाधव, हरीश भडांगे, रत्नाकर शेट्टी, सोमनाथ आढाव, किशोर खताळे, लक्ष्मण पवार, विवेक चव्हाण, रामा साळवे, सोनू बिडवे, सोमनाथ आव्हाड आणि ललित सुराणा यांनी परिश्रम घेतले.



(रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या दिव्यांगांच्या विवाहसोहळ्याची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZSVCA
Similar Posts
दसरा-दिवाळी-नाताळसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या नाशिक : दसरा-दिवाळी-नाताळच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांसाठी विविध मार्गांवर अतिरिक्त गाड्या सोडणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. एक ऑक्टोबरपासून या गाड्या सुरू होत आहेत.
नाशिक कारागृहात कम्प्युटर लॅब; ही सुविधा असलेले देशातील पहिले कारागृह नाशिक : साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ पुस्तक जिथे लिहिले, त्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात अद्ययावत कम्प्युटर लॅब सुरू झाली आहे. कम्प्युटर लॅब सुरू करणारे हे देशातील पहिलेच कारागृह ठरले आहे. मुंबईच्या समता फाउंडेशनच्या सहकार्याने ही लॅब सुरू झाली असून, कैद्यांना रोजगाराभिमुख शिक्षण दिले जाणार असल्याची
रोटरी क्लब नाशिक जिल्ह्यात पाणी नियोजनावर देणार भर नाशिक : ‘समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या रोटरीचे कार्य विश्वव्यापी होत असून, त्यासाठी अधिकाधिक सदस्य नोंदणी करणे ही बाब क्रमप्राप्त आहे. नाशिक जिल्ह्यात पाणी नियोजनावर रोटरीने आपले लक्ष केंद्रित केले असून, नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांना पाणीटंचाई बाराही महिने भासणार नाही, यासाठी रोटरी क्लब धडपडत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नाशिक रोड रेल्वेस्थानकाची पाहणी नाशिक : सध्या देशात असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, तसेच प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या दर्जात्मक आणि गुणात्मक सेवा याची पाहणी करण्यासाठी मध्य रेल्वेचे मुंबई येथील सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) डॉ. आर. बद्रीनारायण यांनी चार मार्च २०१९ रोजी नाशिक रोड रेल्वेस्थानकाला भेट दिली. स्थानकातील प्रवासी सुरक्षा व सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language